Advertisement
नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ध्वजावंदन करून भारतीय जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जोपर्यंत चंद्र आण सूर्य आहे तोपर्यंत सन्मानाने आपला तिरंगा झेंडा सन्मानाने डौलत राहील,असे विधान फडणविस यांनी केले.अमृतकालातील स्वातंत्र्यदिनाच्या जगभरातील भारतीयांना आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो,असेही ते म्हणाले.विभागीय आयुक्त कार्यालय त्यांनी ध्वजावंदन केले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेृत्त्वात महाराष्ट्रातील शेवटच्या माणसाची स्वप्ने पूर्ण करत विकासासकडे जातील, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी दोन्ही नेत्यांचे कौतुक केले.