Published On : Mon, Mar 28th, 2022

पांढरकवडा वनविभागातील पक्षी या पुस्तकाचे अनावरण

Advertisement

पांढरकवडा : जागतिक वन दिनाचे औचित्य साधुन पांढरकवडा वनविभागातील पक्षी या पुस्तकाचे अनावरण प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) म.रा. नागपूर सुनिल लिमये यांचे हस्ते वनभवन, नागपूर येथे करण्यात आले.

पुस्तकाचे लेखन व संकलन पांढरकवडा येथील मानद वन्यजीव रक्षक व शिवरामजी मोघे महाविद्यालय, पांढरकवडा येथील जीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रमझान विराणी यांनी केले आहे. पुस्तकाचे प्रकाशन वनविभाग पांढरकवडा यांचे मार्फत करण्यात आले आहे. निसर्गातील प्रत्येक घटक आपल्याला खूप गोष्टी शिकवत असतो पक्षी आपल्याला जीवनाचे खरे महत्व सांगतात. आकाशात उंच व स्वच्छंद गगन भरारी घेणे घार शिकवते. तर जवळ हळू पोहणे बदक शिकवतो. लक्ष प्राप्ती साठी स्थिरता बगळा शिकवतो.

Advertisement


अशक्य अशा ठिकाणी घरटे बांधण्याचे बळ आपल्याला बाया पक्षी सांगतो. ते आपल्याला जैव विविधतेचा आदर करायला शिकवतो. तर कबुतर आपल्याला प्रेम व शांतीचा संदेश देतो. या पुस्तकामध्ये पांढरकवडा वनविभागात आढळणाऱ्या २५६ वेगवेगळ्या पक्षांची माहिती देण्यात आलेली आहे. पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील सर्व माहिती द्विभाषेत (मराठी व इंग्रजी) दिलेली असुन सर्व पक्षांच्या नैसर्गिक छायाचित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे.

पांढरकवडा वनविभागातील पक्षांची ओळख व पक्षांविषयी शास्त्रशुध्द माहिती विविध वयोगटातील नागरिक, वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभुमीचे विद्यार्थी व वनपर्यटक यांचेपर्यंत पोहचविणे हा यामागील प्राथमिक उद्देश आहे. पक्षांविषयी आवड असलेले विद्यार्थी, चोखंदळ पक्षीनिरीक्षक, पक्षीप्रेमी, वनपर्यटक तसेच वनविभागचे क्षेत्रीय कर्मचारी या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त ठरेल अशी माहिती किरण जगताप उपवनसंरक्षक, पांढरकवडा यांनी दिली आहे

योगेश पडोळे
प्रतिनिधी पांढरकवडा