नागपूर: शहारत दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे.आज सकाळी 9:55 वाजता मानकापूर येथील उपाध्याय गेस्ट हाऊस रिंग रोडवर भरधाव मोटरसायकलने (क्र. MH 31 EJ 4385) पायी चालणाऱ्या वृद्धाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वृध्द गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मोटारसायकलस्वार हा मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. एका ऑटो चालकाने या अपघाताची माहिती पोलिसांना दिली मात्र वृत्त लीहीपर्यंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले नाही.