कन्हान : – गट ग्राम पंचायत वराडा (वाघोली) च्या उपसरपंच करिता झालेल्या निवडणुकीत सरपंचा च्या निर्णायक मतामुळे भाजप कॉंग्रेस च्या सौ उषा सुरेश हेटे उपसरपंच पदी विजयी झाल्या .
गुरुवार (दि.२७) ला ग्राम पंचायत कार्यालय वराडा येथे पंचायत समिती पारशिवनी चे सहाय्यक गट विकास अधिकारी मा.प्रंशात मोहड निर्णायक निवडणुक अधिकारी व ग्राम सचिव लांजेवार यांनी उपसरपंच निवडणुक पार पाडली . उपसरपंच पदा करिता भाजप कॉंग्रेस युतीच्या सौ उषा सुरेश हेटे व शिवसेना स्वतंत्र युतीचे राकेश गणेश काकडे या दोन अर्जाचे नामकंन दाखल करण्यात आले होते .
गुप्तदानात दोघांनाही ५ – ५ मतदान बरोबर झाल्याने नवीन जी आर नुसार सरपंचाला निर्णायक दुस-या मतदानाचा अधिकार प्राप्त असल्याने सरपंचाच्या निर्णायक मतदानाने भाजप कॉंग्रेस युतीच्या सौ उषा सुरेश हेटे ५ विरूध्द ६ मतांनी उपसरपंच पदी विजयी झाल्याचे निवडणुक निर्णायक अधिकारी प्रंशात मोहड यांनी जाहीर केले .
भाजप कॉंग्रेस युतीच्या सौ उषा हेटे उपसरपंच पदी विजयी झाल्या बद्दल माजी सभापती कृ उ बा समिती पारशिवनी देविदास जामदार, माजी उपसभापती देवाजी शेळकी, मा विशेष फुटाणे , माजी सरपंच भैयाराव शेळकी , अशोक वरठी, सरपंचा विद्या चिखले, सिमा शेळकी, क्रिष्णा तेंलगे, धोंडबाजी चरडे, अभय हेटे, दिलीप चिखले, मारोती नागमोते, कैलास पुंड, क्रिष्णा खिळेकर, मारोती जामदार, प्रभाकर चिखले, प्रशांत चरडे , गणेश घोडमारे , गजानन शेळकी , संजय जामदार, भुपेश गि-हे सह गावक-यांनी अभिनंदन केले .