Published On : Wed, Sep 28th, 2022
By Nagpur Today Nagpur News

कलर्स मराठी च्या “सुर नवा ध्यास नवा ” सिझ न ५ संगीतमय शो मध्ये उत्कर्ष वानखेडे विजेता.

Advertisement

कन्हान : – कलर्स मराठी वाहिनी वर यावर्षी “सुर नवा ध्यास नवा” या संगीतमय मालिकेचे सीझन २ सुरू झाले. उत्कर्ष वानखेडे याची ऑडिशन होऊन त्यात निवड झाली. दरम्यान या स्पर्धेत एकापेक्षा एक सरस कामगिरी करीत त्याने दोनदा “राजगायक” हा किताब मिळविला. आणि संपुर्ण शो मध्ये स्वरांचे उत्तम सादरी करण व गायनाची जादु दाखविल्याने अंतिम फेरीत त्याला स्पर्धेचा विजेता घोषित करण्यात आले.

नागपुर जिल्हयातील कन्हान या ग्रामिण भागात राहणारा उत्कर्ष रविंद्र वानखेडे हयाने या आधी ” सुर नवा ध्यास नवा” छोटे सुरवीर या प्रथम मालिकेत प्रवे श करीत अतिशय सुमधुर व उत्कृष्ट गायन कला सादर करीत त्याने टॉप ६ पर्यंत भरारी घेत संगीत क्षेत्रात भरारी घेतली. उत्कर्ष ला बालवया पासुन आजोबां व वडिलां पासुन संगीताचे संस्कार व बालकळु मिळाले, शालेय शिक्षण व संगीताचे शिक्षण घेत असतांना अव घे १० वर्षाच्या वयात सर्वप्रथम “द व्हॉईस किडस ” या एण्ड टीव्ही वरील स्पर्धेत सहभागी होत टॉप २० पर्यंत मजल मारली. स्पर्धेत परिक्षक म्हणुन हिंदी सिनेसृष्टी तील प्रसिध्द गायक शान, संगीतकार शेखर, निती मोहन यांनी उत्कर्ष च्या पाठीवर कौतुकाची थाप दिली .

Gold Rate
07 April 2025
Gold 24 KT 88,800/-
Gold 22 KT 82,600/-
Silver / Kg - 89,800/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

तदंतर उत्कर्षने कधीच मागे बघितलं नाही. एकामागे एक स्पर्धेत सहभाग घेत आपल्यातील सुप्त कलेचा आविष्कार करीत यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. वयाचे १२ व्या वर्षी सारेगमप लिटिल चॅम्पस या झी टीव्ही कृत गायन रियालिटी शो मध्ये सहभागी होत तो टॉप ६ च्या पंक्तीत स्थान पटकाविले. तेव्हा शोमध्ये परिक्षक म्हणुन गायक नेहा कक्कड, संगीतकार हिमेश रेशमिया, जावेद अली व श्रोत्यांनी अक्षरशः त्याच्या गायनास उत्तम दाद दिली. ” म्युझिक की पाठ शाळा व लव्ह मी इंडिया ” या संगीतमय मालिकेत त्याने १० एपिसोड पर्यंत उत्तम कामगिरी करीत आप ल्या कलेचे सादरीकरण केले आहे. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनी वरील “सुर नवा ध्यास नवा” छोटे सुर विर ” या संगीतमय रियालिटी शो मध्ये सहभागी होत फिनाले पर्यंत मजल गाठत टॉप ६ मध्ये पोहचुन स्वतः ला सिध्द केले.

यावर्षी कलर्स मराठी वाहिनी निर्मित ” सुर नवा ध्यास नवा, पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे ” या सिझन ५ या संगीत गीत गायन रियालिटी शो मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याने संधीचे सोने करीत उत्कर्ष ने अतिशय सुरेख व उत्तम, प्रतिभावंत गायन करीत स्पर्धेत दोनदा राजगायक होण्याचा मान मिळविला. राजगायक म्हणुन अँकर स्पृहा जोशी लिखित ” श्रीमंत महाराष्ट्र ” या शीर्षकाचे गाणे त्याच्या स्वतःच्या आवा जात ध्वनिमुद्रित करण्यात आले.

त्यास ही श्रोत्यांनी चांगलेच पसंत केले आहे. त्यानंतर दि.२५ सप्टेंबर ला मुंबईत झालेल्या (ग्रँड फिनाले) महाअंतिम सोहळयात ६ स्पर्धक असल्याने अंत्यत चुरशी च्या सामन्यात अंत्यत मंत्रमुग्ध होत लयबद्ध अप्रतिम सुरेल शास्त्रीय संगीत च्या नियमाला धरून गाणी सादर करीत त्याने स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. कलर्स मराठी वाहिनी तर्फे त्याला विजेता घोषित करून पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक प्रसिध्द संगीतकार ” कल्याणजी-आनंद जी फेम ” आनंदजी च्या हस्ते ” मानाची सुवर्ण कट्यार ” देऊन गौरविण्यात आले. तसेच त्याला या स्पर्धे मध्ये प्रसिद्ध गायिका व संगीतकार वैशाली सामंत सोबत स्वतःच्या आवाजात अल्बम मध्ये व संगीतकार निषाद गोलंबरे यांचे सोबत अल्बम मध्ये एक एक गाणे कर ण्याची संधी बहाल करण्यात आली. यामु़ळे त्याला चित्रपटात दोन गाणे गाण्याची संधी प्राप्त झाली आहे.

स्पर्धेत परिक्षक म्हणुन प्रसिद्ध शास्त्रीय गायक श्री. महेश काळे व प्रसिद्ध संगीतकार श्री अवधुत गुप्ते यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. संपुर्ण मालिके चे सुत्रसंचालन चित्रपट अभिनेत्री स्पृहा जोशी हयानी केले.

उत्कर्ष ने अंत्यत जिद्दीने मेहनत करित वयाच्या १७ व्या वर्षी ही स्पर्धा जिंकुन आपले, परिवाराचे, गावाचे व पर्यायाने आपल्या नागपुर जिल्हयासह विदर्भाचे नाव मोठे केले आहे. या विजयाने संपुर्ण कन्हान व नागपुर जिल्हा परिसरात आनंदाचे वातावर ण निर्माण झाले आहे. उत्कर्षच्या यशाने संपुर्ण विदर्भ प्रांताचा नावलौकिक झाल्याने उत्कर्ष वर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. या यशाचे श्रेय त्याने आपले गुरू व वडील श्री रवींद्र सुधाकर वानखेडे व आई सौ. शरयु रवींद्र वानखेडे, आजोबा श्री सुधाकरजी वानखेडे, आजी सौ. सुलोचना वानखेडे, काका आशिष वानखेडे, काकु ज्ञानदेवी वानखेडे व समस्त कुटुंबीयांना दिले असुन हा सर्वोच सन्मान दिल्याबद्दल परिक्षकांचे, संगीत चमु आणि कलर्स मराठी वाहिनेचे मनपुर्वक आभार व्यकत केले आहे.

Advertisement
Advertisement