शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमरेड तालुका अध्यक्षपदी उत्तम जागोबाजी पराते यांची निवड माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी केली उत्तम पराते पत्रकार असून समाजकार्य त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे, उत्कृष्ट पत्रकार उत्कृष्ट लेखक उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे.
यापूर्वी सुद्धा उत्तम पराते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस उमरेड तालुक्याची जबाबदारी सांभाळत निवडणूक सुद्धा लढविली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माजी मंत्री श्रावणजी पराते यांनी उत्तम पराते यांच्या कार्याचा गौरव केला. व जिल्हा अध्यक्षांचे आभार मानले. नागपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ राऊत यांनी नियुक्त पत्र देऊन उत्तम पराते यांची राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी निवड केली, निवडी बद्दलचे नियुक्तीपत्र माजी मंत्री अनिल बाबू देशमुख यांनी उत्तम पराते यांना दिले, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष राजू राऊत, उपाध्यक्ष पद्माकर बावणे, भिवापूर येथील गौरव गायगवळी, गुड्डू नगराळे, शितल राजूरकर,व संदीप उपस्थित होते.
पराते यांच्या नियुक्ती बद्दल खरेदी विक्रीचे संचालक सुरज कांबळे, संजय मंदे, बेला सेवा सोसायटीचे अध्यक्ष रमेश भोयर , बोरगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अशोक मून, तुकाराम फलके, दिनेश गोडघाटे, कैलास साठवणे, मृणाल नेटे, ईश्वर लांबट, नारायण तीमांडे, प्रशांत कांबळे, किशोर शेळके, अमर सुके, प्रशांत पुरी, भूषण घुमडे, रघुनंदन पादाडे, राजेंद्र के महाले, सतीश मुंजे, राजू धोडरे, राजेंद्र सूर्यवंशी व अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले