कामठी :-कामठी तालुक्यात कोरोना विषाणू दिवसेंदिवस पाय पसरवत चालला आहे. कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे मात्र नागरिक लसीकरण करून घेण्यासंबंधी जागरूक किंवा तत्पर दिसून येत नाहीत , वाढती रुग्ण संख्या पाहूनच लॉकडॉऊन लागले आहे मात्र इकडे लोकं लसीवाद भृमित नसून खोट्या प्रचाराला बळी पडत आहेत.
कोरोना विषाणूचा एकमेव उपचार लसीकरण करून घेणे हेच आहे.कोरोनावर नोयंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.लसीकरण कोरोनाशी दोन हात करण्यास सक्षम आहे तेव्हा नागरिकानो लसीकरण करून घ्या असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी तालुक्यातील खेडी ग्रा प अंतर्गत पांढुरणा गावात लसीकरण च्या जनजागृती कार्यक्रम दरम्यान केले.
याप्रसंगी गट विकास अधिकारी अंशुजा गराटे तसेच तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जास्तीत जास्त लसीकरण करून गती वाढविण्यासाठी गावात गृहभेटी देऊन गावातील लोकांना लसीकरण करून घेण्याबाबत प्रवृत्त करण्यात आले. तसेच गावातील लोकांच्या मनात लसीकरण बाबत ज्या गैर समजूत्ती होत्या त्या जाणून घेतल्या व त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदर भेटीदरम्यान आरोग्य विस्तार अधिकारी दिघाडे, कातुरे , तसेच मंडळ अधिकारी आणवाने, गावातील ग्रामपंचात सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका, आशा सेविका ,राशन दुकानदार हजर होते.