नागपूर: नागपूर जिल्हयातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुसाठी लसीकरण कार्यक्रम इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे नविन बिल्डींग, पहिला माळा, बाहय रुग्ण विभागातील लसीकरण कक्ष क्रमांक 38 येथे दिनांक11 जुलै ते 20 जुलै 2019 दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 12 ते 2 या कालावधीत करण्यात येईल, असे प्राध्यापक व विभाग प्रमुख, जनऔषधवैद्यकशास्त्र विभाग, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.