नागपूर: कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला ९००० डोस प्राप्त झाले आहेत. अद्यापही कोव्हिड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड / कोव्हॅक्सीन लसीकरणाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस न घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाउन लसीकरण करून घेण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. मनपाकडे कोव्हॅक्सीनचा साठा 31 जानेवारी पर्यंत आणि कोव्हिशिल्डचा साठा 9 फेब्रवारी पर्यंतच आहे. नागरिकांनी लवकरात – लवकर या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुध्दा करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गापासून बचावाचे मोठे अस्त्र कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर शहरातील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी लसीकरणाचे अभियान चालविण्यात आले होते. त्याचेच फलीत म्हणजे शहरात पात्र व्यक्तींच्या संख्येपेक्षा अधिक जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. दुस-या डोससाठी काही नागरिकांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे. याशिवाय दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येतो. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे लसीकरण करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून झालेल्या लस पुरवठ्यानुसार शहरात लसीकरण अभियान चालविण्यात आले आहे. झोननिहाय मनपाच्या विविध केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात येत असून लसीकरणापासून अद्याप वंचित असलेल्यांनी त्वरीत आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
कोव्हिशिल्ड लसीकरण केंद्र
वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत