बीड: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबरला हत्या करण्यात आली. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आले त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पवनचक्की खंडणी प्रकरणातील गुन्ह्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग आढळल्याने वाल्मीक कराडवर हत्येसह मकोकाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टासमोर हजर केलं असता कराड याला सुरुवातीला ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं. प्राथमिक तपास पूर्ण झाला असल्याने पोलीस यंत्रणेकडून कराडच्या कोठडीची मागणी न करण्यात आल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. image.png