नागपूर : महाविकास आघाडी आणि वंचितमध्ये जागावाटपाची चर्चा निष्फळ ठरल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपली वेगळी आघाडी तयार करत उमेदवार जाहीर केले. मात्र असे असले तरी वंचित बहुजन आघाडीने मविआच्या काही उमेदवारांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे.
बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला आहे. बारामतीमध्ये आपण उमेदवार देत नसल्याचे स्पष्ट करत सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला आहे.
तसेच वंचित आघाडीने पुण्यातून वसंत मोरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच याअगोदर वंचितकडून कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आणि गडकरींचे विरोधक उमेदवार काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा देण्यात आला आहे.
वंचितने या आधी दोन याद्या जाहीर केल्या होत्या. आता तिसऱ्या यादीत नांदेडमधून अविनाश बोसिरकर, परभणीतून बाबासाहेब उगळे, छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान, पुण्यातून वसंत मोरे आणि शिरूरमधून मंगलदास बांदल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.