Advertisement
23 हजार 700 रुपयांचा ठोठावला महसूल दंड
कामठी :-कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या वारेगाव-बिना रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची गुप्त माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांना मिळताच काल रात्री रेती घाटावर घातलेल्या धाडीत तीन वाहने जप्त करून प्रति वाहनावर सात हजार 900 रुपये महसूल दंड ठोठावत एकूण 23 हजार 700 रुपयांचा महसूल दंड ठोठावण्यात आला.
या कारवाहोत बोलेरो पिकअप क्र एम एच 40 बी जी 6046, एम एच 40 बी एल 8148, एम एच 40 ए टी 1898 क्रमांकाची वाहने जप्त करीत विजय लांजेवार रा कामठी, नागेश मेश्राम रा भानेगाव, दादाराव निखाडे रा बिना यांच्यावर एकूण 23 हजार 700 रुपयांचा महसूल दंड ठोठावण्यात आला.
ही यशस्वी कारवाही तहसीलदार अरविंद हिंगे, अमोल पौड, युवराज चौधरी, राम उरकुडे, शेख शरीफ यांनी केली
संदीप कांबळे कामठी