कामठी :-आपल्या कार्यकर्त्याना खुश करून व त्यांच्या माध्यमातून पक्षसंघटन मजबूत व्हावे त्याच बरोबर सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क होऊन त्यांच्याशी जवळकी साधता यावी यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा व तालुका स्तरावर विविध विभागात विविध समित्या स्थापन केल्या जातात व या समितीत अशासकीय सदस्य पदी आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येते परंतु सरकार बद्दलताच ह्या समिती आपोआपच बरखास्त होतात यानुसार नुकतेच झालेल्या सत्ता परिवर्तन नुसार तत्कालीन भाजप सरकार च्या ठिकाणी महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन झाली असून यापूर्वी भाजप सरकारने गठीत केलेल्या जिल्हा व तालुका स्तरावरील शासनाच्या विविध समित्या बरखास्त झाल्या यानुसार कामठी तालुक्यातील विविध समित्या बरखास्त झाल्या आहेत तर आता या समितीच्या अशासकीय सदस्य पदासाठी नव्याने निवड केल्या जाणार आहे.
पूर्वीचे भाजप सेना युतीचे सरकार जाऊन आता कांग्रेस-राष्ट्रवादी कांग्रेसव शीवसेनाचे महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेत आले आहे त्यामुळे आता कामठी तालुक्यातील महत्वाची संजय गांधी निराधार अनुदान वाटप या समितीसह रोजगार हमी योजना समिती, दक्षता समिती, संनियंत्रण समिती यासह इतर विविध समित्या ह्या बरखास्त झाल्याने भाजपच्या कार्यकर्त्याची समितीच्या अशासकीय सदस्य पदावरून गच्छांती झाली आहे व ह्या सदस्यांना आता समिती सदस्य पदापासून मुकावे लागले आहे तर दुसरीकडे सरकार बद्दलताच बरखास्त झालेल्या समित्या आता पुन्हा केव्हा गठीत होणार याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.
संदीप कांबळे कामठी