Advertisement
नागपूर: नागपूरच्या सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वसंतराव नाईक झोपडपट्टीत बुधवारी रात्री दोन व्यक्तींची हत्या झाल्याची घटना घडली.
तडीपार गुन्हेगार सागर मसराम आणि त्याचा साथीदार लक्ष्मण गोंदिया या दोघांवर चंद्रशेखर उर्फ चंदू इरपाते आणि त्याचा भाऊ पंकज इरपाते यांनी हल्ला केला. या हल्ल्यात सागर मसरामचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत चंद्रशेखर आणि पंकज इरपाते या दोघांना अटक केली आहे.
प्राथमिक तपासानुसार, जुन्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. सागर मसराम हा तडीपार असूनही शहरात वास्तव्यास होता, तर लक्ष्मण काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता.या प्रकरणाचा पुढील तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत.