Advertisement
नागपूर : नागपुरातील वसंतराव नाईक कृषी विस्तार व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्थेच्या (वनामती) महासंचालक श्रीमती वसुमना पंत यांनी आज (ता. २ एप्रिल) नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.
त्यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांची भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
श्रीमती वसुमना पंत या २०१७ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी असून यापूर्वी त्यांनी रेशीम संचालनालयच्या संचालक, वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), नंदूरबार येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या (आयटीडीपी) प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.