मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.
२०२० मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासले होते. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. अखेर आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे.
सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले.
सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांच निधन झाले.