मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत तसेच चाहत्यांमध्ये
शोककळा पसरली आहे. मनोज कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट दिले. ‘पूरब और पश्चिम’, ‘उपकार’, ‘क्रांती’ यांसारख्या देशभक्तीपर चित्रपटांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांनी ‘भारत कुमार’ या नावानंही ओळखलं जातं. रुपेरी पडद्यावर त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ते ओळखले जातात. त्यांचे मूळ नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म 1937 साली अबोटाबाद येथे झाला होता. आता हे स्थान पाकिस्तानात आहे.
देशभक्तीवर मनोज कुमार यांनी अनेक सिनेमे केले, ते सर्व लोकप्रिय झाले त्यामुळे त्यांचे नाव भारत कुमार असेच झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय सिनेसृष्टीत एक युग समाप्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.