Advertisement
नागपूर: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे ४ ऑगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी समारंभ आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
गुरुवारी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
त्यांनी विविध विभागांवर सोपवलेल्या जबाबदाऱ्यांचा आढावा घेतला. महसूल, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे अधिकारी उपस्थित होते.