नागपूर : मध्य रेल्वेच्या अथक प्रयत्नातर नागपूर-मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, गोंदिया-मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस आणि मुंबई-हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस या गाड्या ३० किलोमीटर प्रती तास गतीने धावणार आहेत. याअनुषंगाने मध्य रेल्वेने इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या ५२६.७२ किलोमीटर अंतराच्या मार्गावर सुधारणा केली.
रेल्वेने या मार्गावरील वरील गाड्यांची गती नियमित सुद्धा केली आहे. त्यामुळे आता दुरंतो, विदर्भ, गीतांजली एक्स्प्रेस सुसाट धावणार आहेत. इगतपुरी-भुसावळ-बडनेरा या ५२६.७२ किलोमीटर अंतराच्या अप आणि डाऊन मार्गावर काही सुधारणा करण्यात आली आहे.या मार्गावर १२२८९ मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेस, १२२९० नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेस, १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस आणि १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस या सहा गाड्या २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान १३० किलोमीटर प्रति तास गतीने चालविण्याची चाचणी घेण्यात आली आहे. याला यशही आले.
हे पाहता मुंबईवरून येणाऱ्या गाड्यांची सरासरी २८ मिनिटे आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची सरासरी ३० मिनिटे वेळेची बचत झाली. चाचणी यशस्वी झाल्यामुळे वरील सहा एक्स्प्रेस नियमित १३० किलोमीटर प्रति तास गतीने नियमित धावण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्यामुळे आता दुरंतो, विदर्भ, गीतांजली एक्स्प्रेस सुपरफास्ट धावणार आहेत.