नागपूर : विदर्भाने दुसऱ्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशचा 62 धावांनी पराभव केला.यासह विदर्भाने रणजी ट्रॉफी 2023-24 ची अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम फेरीत विदर्भाचा सामना मुंबईशी होणार आहे. उपांत्य फेरीच्या सुरुवातीला विदर्भाची स्थिती चांगली नव्हती पण दुसऱ्या डावात त्यांनी शानदार पुनरागमन केले.आता विदर्भासाठी ही फायनल अवघड असेल कारण मुंबईने 41 वेळा विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही संघांनी गेल्या दोन वर्षांत एकही विजेतेपद पटकावलेले नाही.
अमन मोखाडे, यश राठोड या युवा शिलेदाराच्या जोडीला ध्रुव शोरे, करुण नायर व अक्षय वाडकर या अनुभवी दिग्गजांची साथ लाभल्याने रणजी करंडक उपांत्य सामन्यात यजमान विदर्भाने मध्य प्रदेशला धूळ चारली. पहिल्या डावात ८२ धावांनी पिछाडीवर पडलेल्या विदर्भाने तिसऱ्या दिवसाअखेर सहा बाद ३४३ धावा करीत २६१ धावांची आघाडी घेतली आहे.
या लढतीत आणखी दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. त्यामुळे नाबाद असलेली यश राठोड आणि आदित्य सरवटे ही जोडी व उर्वरित फलंदाज किती धावांची भर घालतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. साडे तीनशे ते पावणे चारशे धावांची आघाडी मध्य प्रदेशच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवण्यास पुरेशी ठरू शकते. पहिल्या डावात विदर्भाच्या तळाच्या फलंदाजांना झटपट गुंडाळणाऱ्या मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना दुसऱ्या डावात यजमानांच्या फलंदाजांना अडचणीत आणताना बराच घाम गाळावा लागला.
अथर्व तायडे बाद झाल्यामुळे नाईट वॉचमन म्हणून मैदानात आलेला अक्षय वखरे सकाळी फार काळ टिकू शकला नाही. अनुभवाच्या गोलंदाजीवर त्याने स्लीपमध्ये झेल दिला. त्यानंतर आलेला अमन मोखाडे सुरुवातीला चाचपडत खेळत होता. मात्र, स्थिरावल्यावर त्याने काही अप्रतिम फटके मारले. संयम दाखविताना त्याने आपण विदर्भासाठी भविष्यातील आशास्थान आहोत, हे दाखवून दिले.
विदर्भ पहिला डाव १७०, मध्य प्रदेश पहिला डाव २५२, विदर्भ दुसरा डाव सहा बाद ३४३ (ध्रुव शोरे ४०, सहा चौकार, अमन मोखाडे ५९, सात चौकार, करुण नायर ३८, यश राठोड खेळत आहे ९७, अक्षय वाडकर ७७, आठ चौकार, आदित्य सरवटे खेळत आहे १४, तीन चौकार, आवेश खान १-६५, अनुभव अग्रवाल २-६८, कुलवंत खेजरोलिया १-४५, कुमार कार्तिकेय २-७३०.