Advertisement
नागपूर : कोरडी येथील जगदंबा मंदिरामागील राखेचा बंधारा मंगळवारी पहाटे फुटल्याची घटना घडली आहे. या घटनेदरम्यान राख उचलण्याच्या कामात गुंतलेले आठ ट्रक बुडाले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली आहे. कोरडी पवार प्लांट आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून सध्या राखेचे पाणी वळविण्याचे काम सुरू आहे.
यापूर्वी जुलै २०२२ मध्येही मुसळधार पावसामुळे राख धरण फुटले होते. त्यामुळे लाखो टन राख आजूबाजूच्या परिसरात शिरली होती. धरण फुटल्याने खसला, मसाला खैरी, कवठा, सुरादेवी परिसरातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. एवढेच नाही तर राखेचे पाणी पिवळी नदी आणि कन्हान नदीतही गेल्याने नागपूर शहरासह ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावरही परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.