नागपूर : ड्युटीवर असलेले ट्रॅफिक पोलीस आणि त्यांची टीम चुकीच्या ठिकाणी पार्क केलेली तुमची वाहने तर काढतातच, पण ते काही उदात्त कर्तव्यही पार पाडतात याचे उत्तम उदाहरण आज पाहायला मिळाले.
शहरातील कॉटन मार्केट परिसरातील डरलाईनमध्ये पडलेल्या गाईचे यशस्वीरित्या रेस्क्यू ॲापरेशन करण्यात आले. ट्राफीक पोलीसांनी टोईंग मशीनच्या सहाय्याने गाईचे रेस्क्यू ॲापरेशन राबविले. एक दीड तासांच्या मेहनीनंतर गाईल सुखरुप बाहे काढण्यात आले. कॉटन मार्केट वाहतूक पोलीसांच्या या कृतीचे गोसेवकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
गडरलाईनमध्ये गाय पडल्याची माहिती मिळताच
ड्युटीवर असलेले वाहतूक पोलीस अधिकारी संगीता घनगडे आणि उज्ज्वल पराते आणि मंगेश बोबडे यांच्यासह त्यांच्या टोईंग टीमने गाईला टोइंग बेल्टने बांधले आणि सावधपणे वर उचलले.