Advertisement
नागपूर – ताज बाग परिसरालगत असलेल्या एका कूलर कारखान्यात आज दुपारी भीषण आग लागली. आगीचे लोट आणि धूर आकाशात उंच जाण्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
या आगीत कारखान्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. आग लागण्याचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फायर ब्रिगेडचे जवान आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी सतर्क असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.