नागपूर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र पोलीस विभगाची प्रतिमा मलिन होत असलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतेच नागपुरातील एका पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांचा मद्यधुंद अवस्थेत जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता नांदेड रेल्वे पोलीस स्टेशन मधील पोलिसांचा जुगार खेळण्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
नांदेड रेल्वे पोलीस स्टेशनचे इंचार्ज साहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ आहे. काल रात्री औरंगाबाद रेंज चे रेल्वे एसपी स्वाती भोळ यांची रेल्वे पोलीस स्टेशन येथे व्हिजिट झाली. त्यानंतर लगेच काल रात्री नऊ वाजता पोलीस स्टेशन मध्येच वरच्या रूम मध्ये हा जुगारचा खेळ सुरु झाला.तिथल्याच एका व्यक्तीने पोलिसांचा जुगार खेळतानाचा व्हिडीओ चित्रित केला. त्यानंतर आज हा जुगारचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
या व्हिडिओची शाहानिशा करण्याकरिता साहय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत पांचाळ नांदेड रेल्वे पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी वृत्ताला दुजारादिला.
तसेच पोलिसांच्या या चुकीला माफी नाही.वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे अहवाल पाठविण्यात येईल,असे सांगितले. तसेच लोहमार्ग एसपी स्वाती भोर यांच्याशी संपर्क केला असता योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा धुळीस मिळाली आहे.विश्वसनीय सूत्रानुसार व्हिडिओमध्ये जुगार खेळताना पोलिस उपनिरीक्षक गरड, पुलिस शिपाई सुरणार ,बड़े , गजभे , देवरे , थेर आदी पोलीस अधिकारी दिसत आहेत.