नागपूर: भाजपच्या दिव्यांग आघाडीच्या वतीने आज नागपुरात दिव्यांग बांधवांना राखी बांधण्याचा कार्यक्रम देवगिरी बंगल्यावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी अनेक दिव्यांग बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनचा सण साजरा केला.
दिव्यांग बांधवांना राखी बांधल्यानंतर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यंदाचा रक्षाबंधनाचा सण माझ्यासाठी खूप खास आहे. मी आधी माझ्या दोनच भावांना राखी बांधायचे, आता दिव्यांग बांधवानाही राखी बांधत आहे.
असेही अमृता फडणवीस म्हणाल्या. सरकारने चांगल्या हेतूने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. ती ते पुढेही सुरू ठेवतील.या माध्यमांतून मोठी मदत महिलांना मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना कोट्यवधी बहिणीं लाभल्या आहेत. तर मलाही तेवढ्याच नणंद लाभल्या अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.