नागपूर : सरकारी रुग्णालयात नर्सिंगच्या एएनएम उमेदवारांना प्राधान्य तर जीएनएम -बीएससी नर्सिंग पदवीधारक अद्यापही बेरोजगार असल्याचा आरोप पदवीधारक विद्यार्थिनींनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जीएनएम तथा बीएससी नर्सिंग कोर्स करणाऱ्या पदवीधारक महिला उमेदवारांना प्रशासनाकडून वेठीस धरले जात आहे.या जीएनएम पदवीधारक महिलांनी ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत आपल्या व्यथा मांडल्या.
एएनएम नर्सिग आणि जीएनएम नर्सिंग अभ्यासक्रम वेगळा आहे. मात्र एएनएमपेक्षा जीएनएम नर्सिंगच्या अभ्यासक्रमाला जास्त महत्त्व असते. मात्र तरी देखील एएनएम वाल्या उमेदवारांना नौकऱ्या दिल्या जातात. आम्ही अजूनही बेरेजगार असून आमच्यावर हा अन्याय का ? असा सवाल या महिलांनी उपस्थित केला.
आम्हाला लाडकी बहिणीचे पैसे नकोत नौकऱ्या द्या –
सरकार एकीकडे आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये महिना पैसे टाकत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांना आपल्या लाडक्या बहिणींना नौकरी द्यावीशी वाटत नाही. आज आमच्यासारख्या हजारो महिला पदव्या घेऊन बसल्या आहेत. पण सरकारला त्याचे काहीच देणे-घेणे नाही, असे या महिलांचे म्हणणे आहे.