नागपूर : शहरातील कोतवाली पुलिस स्टेशन अंतर्गत महल परिसर येथे एका दाम्पत्याना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गोविंद अंजनकर आणि अलका अंजनकर असे या दाम्पत्याचे नाव आहे. ठाकूर नावाच्या व्यक्तीने रागाच्या अंजनकर दाम्पत्याना जाळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.
माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ठाकूर आणि अंजनकर दाम्पत्यामध्ये वाद सुरु होता. हा वाद इतका चिघळला की २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ठाकूर याने थेट अंजनकर यांच्या घरात घुसून त्याच्यावर पेट्रोल टाकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
मात्र दुर्दैवाने कोणतीही मोठी घटना घडली नाही.याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.