Published On : Thu, Sep 12th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ; नागपुरात गणपती प्रतिमेवरुन पेटला वाद,उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवीगाळ करणाऱ्या राजनेत्याविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : शहरातील जरीपटका परिसरात गणपती मूर्तीवरून मोठा वाद पेटला आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

डीसीपी झोन ५ निकेतन कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात रुद्र अवतार गणेश मंडळाने स्थापित केलेल्या गणपतीच्या मूर्तीवर अनेकांनी आक्षेप घेतला. कारण गणपती मूर्तीवरील सोंड ड्रेनेज पाईपद्वारे तयार करण्यात आली होती.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याने मंडळाकडून गणपतीचे विसर्जन करण्यात आले. मात्र या वादात राष्ट्रवादीचे नेते वेदप्रकाश आर्य (वय. ६५ जरीपटका, नागपूर) यांनी उडी घेतली.काही लोकांनी त्यांना दिलेल्या चुकीची माहितीमुळे त्यांनी आवेशात येऊन रुद्र अवतार गणेश मंडळ परिसरात जाऊन गोंधळ घातला. तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शिवीगाळ केली.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. यावरून जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरु केल्याचे कदम म्हणाले.

Advertisement