Published On : Sat, Aug 31st, 2024
By Nagpur Today Nagpur News

Video -नागपुरातील रवि नागर परिसरातील NCCI ऑफिसमध्ये मसन्या उद दुर्मिळ प्राणी निघाल्याने खळबळ !

Advertisement

नागपूर : निसर्गाचा स्वच्छता दूत अशी ओळख असलेला मसन्या उद (उदमांजर) हा दुर्मिळ निशाचर सस्तन प्राणी शनिवारी रवि नागर परिसरातील NCCI ऑफिसमध्ये निघाल्याने खळबळ उडाली.मसन्या उदला पाहिल्यानंतर लोकांनी वाइल्डलाइफ रेस्क्यूअर शुभम जीआरला माहिती दिली.

शुभम जीआरने मसन्या उदला पकडून सुरक्षित अधिवासात सोडले.

Gold Rate
11 April 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver / Kg - 93,100/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

स्मशानभूमीजवळ आढळतो मसन्या उद प्राणी –
मसन्या ऊद हा प्राणी मांसाहारी आणि निशाचर आहे. त्याच्या आंगावर काळे जाड केस असतात. त्याच्या शरीरा इतकीच त्याची शेपटीसुद्धा लांब असते हा प्राणी फळे, मांस, किडे खातो. तसेच दिवसा हा प्राणी झाडाच्या फांदीला किंवा ढोलीत झोपतो. रात्री भक्ष्याच्या शोधात बाहेर पडतो.

हा दुर्मिळ वन्यजीव सहसा स्मशानभूमीजवळ आढळतो.

Advertisement
Advertisement