नागपूर –हुडकेश्वरातील अथर्वनगरीत राहणाऱ्या तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख यांनी घरकाम करण्यासाठी १२ वर्षीय मुलीला बेंगळुरूमधून विकत घेतले होते.
त्यानंतर मुलीचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी मुलीच्या गुप्तांगाला सिगरेटचे चटके देऊन बलात्कार केल्याची माहितीही तपासातून उघडकीस आली.
याप्रकरणातील दोन आरोपींना नागपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.आता याच प्रकरणातील मुख्य महिला आरोपी हीना खानला पोलीसांनी बंगळुरूतून अटक केली. पती आणि भावाने बलात्कार केल्यानंतर हिनाने त्या मुलीच्या पाठीला गरम तव्याचे चटके दिले होते,असे पोलीसांच्या तपासातून उघडकीस आले.
हुडकेश्वरातील अथर्वनगरीत राहणाऱ्या तहा अरमान खान, पत्नी हिना खान आणि मेहुणा अझहर शेख यांनी घरकाम करण्यासाठी १२ वर्षीय मुलीला बेंगळुरूमधून विकत घेतले होते. आरोपी अरमान खान आणि अझहर शेख हे मुलीच्या गुप्तांग आणि छातीला सिगारेटचे चटके देऊन बलात्कार करीत होते. या प्रकाराची हिनाकडे तक्रार केल्यामुळे तिने मुलीच्या पाठीला आणि पोटाला गरम तव्याने चटके देऊन छळ केला.
हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने तपास न केल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हे प्रकरण एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्याकडे दिले होते.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त संजय पाटील आणि उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एएचटीयूच्या अधिकारी संकपाळ यांनी या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक केली. परंतु, मुख्य आरोपी हिना खान ही फरारच होती. ती वारंवार पोलिसांची दिशाभूल करत होती. अखेर हुडकेश्वर पोलीसांनी तिला बंगळुरूतून अटक केली.