Advertisement
नागपूर: हिंगणा विधानसभा क्षेत्रांतर्गत येणार्या मिहान भागाचा विकास करण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करून 2500 कोटी रुपयांचा विकास केला, असा दावा हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी केला आहे. या भागाची ओळख औद्योगिक क्षेत्र म्हणून आहे. या भागात नवनवीन कंपन्या आणून विदर्भातील युवकांना रोजगार मिळवन देण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही ते नागपूर टूडेशी बोलताना म्हणाले.