Published On : Wed, Feb 21st, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडिओ: नागपूरच्या बेसा येथील वैद्य इंडस्ट्रीजच्या फॅक्ट्रीला भीषण आग !

नागपूर: शहरातील बेसा घोगली मार्गावरी वैद्य इंडस्ट्रीजच्या फॅक्ट्रीला भीषण आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.ही आग इतकी भीषण आहे की आगीचे लोटे दूरवर पसरल्याचे चित्र दिसत आहे.या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे.

आगीचे नेमके कारण व मालमत्तेचे किती नुकसान झाले याची माहिती तात्काळ मिळू शकली नसली तरी सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे.

Gold Rate
Saturday 01 Feb. 2025
Gold 24 KT 82,700 /-
Gold 22 KT 76,900 /-
Silver / Kg 94,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माहितीनुसार,शहरातील बेसा चौक घोगली रोडवरील स्वामी समर्थ मंदिराजवळ असलेल्या वैद्य इंडस्ट्रीज नावाच्या फॅक्ट्रीमध्ये बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. फॅक्ट्रीला आग लागल्याची माहिती कळताच स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आगीची माहिती मिळताच महापालिकेचे तीन आणि मिहानचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. घटनेच्या वेळी फॅक्ट्रीमध्ये 200 लोक काम करत होते. कामगारांना आगीची माहिती मिळताच सर्वांनी जीव मुठीत घेऊन पळ काढल्याने ते सुखरूप असल्याची माहिती आहे.

Advertisement