Published On : Fri, Nov 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ; नागपूरमध्ये 94 वर्षाच्या आजीबाईंनी बजावला गृह मतदानाचा हक्क!

Advertisement

नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत 85 वर्षांवरील मतदार आणि अपंग मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाने ‘घरोघरी मतदान’ पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या मतदारांसाठी आज नागपुरात ठिकठिकणी ‘घरोघरी मतदान’ पार पडले. मध्य नागपुरातील ९४ वर्षाच्या सूरज देवी लाटा यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार जेष्ठ आणि दिव्यांग नागरिकांसाठी घरोघरी मतदान प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली, ज्यामुळे 85 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या पात्र मतदारांना तसेच अपंग मतदारांना त्यांच्या घरीच बसून मतदान करता येईल.
जिल्ह्यातील एकूण 3,437 ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार या लाभासाठी पात्र आहेत. या मतदारांना मतदान केंद्रांवर जाण्याची गरज न पडता लोकशाही प्रक्रियेत सहभागी होता यावे यासाठी प्रत्येक मतदारसंघात जाऊन मतपत्रिका गोळा करण्यासाठी समर्पित मतदान पथके तयार करण्यात आली आहेत.

नागपूर दक्षिण पश्चिममध्ये 85 वर्षापेक्षा पेक्षा जास्त 771 मतदार आणि 36 अपंग मतदार आहेत; नागपूर दक्षिणमध्ये 85 वर्षाच्या वर 361 मतदार आणि 36 अपंग मतदार आहेत. नागपूर पूर्व येथे वर्षाच्या वर 128 मतदार आणि 39 अपंग मतदार आहेत. नागपूर मध्यमध्ये 85 वर्षाच्या वर 151 मतदार आणि 18 अपंग मतदार आहेत. नागपूर पश्चिममध्ये 85 वर्षा पेक्षा जास्त 329 मतदार आणि 50 अपंग मतदार आहेत. आणि नागपूर उत्तरमध्ये 85 वर्षा पेक्षा जास्त 84 मतदार आणि 18 अपंग मतदार आहेत.

Today’s Rate
Tuesday 12 Nov. 2024
Gold 24 KT 75,900 /-
Gold 22 KT 70,600 /-
Silver / Kg 90,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि सर्व पात्र मतदारांना मतदान करता येईल याची खात्री करण्यासाठी जिल्हा प्रशासन जनजागृती मोहीम राबवत आहे. घरबसल्या मतदान सेवेत प्रवेश करण्यासाठी मतदारांनी नमुना 12-डी फॉर्म पूर्ण करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, मतदान प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे, परंतु मतदारांची गोपनीयता राखली जाईल.

Advertisement