नागपूर : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुंडांची दहशत पाहायला मिळत आहे.चिंतेश्वर मंदिर घास बाजार येथे काल रात्री ३ मार्चला काही गुंडाचा हौदोस पाहायला मिळाला.
ज्वेलरी शॉप मालक पदमाकर पराते यांच्या दुकानाच्या बाजूला राहणाऱ्या काही समाज कंटकांनी हत्यारासाह ज्वेलरी शॉप फोडून दुकान मालकाला मारहाण केली. यात पदमाकर पराते (वय 47 वर्षे) त्यांचे वडील रुपचंदजी पराते (वय 72 वर्षे) जखमी झाले.
यादरम्यान घटनास्थळी आलेल्या पोलिसांना सुद्धा गुंडानी मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्यापही आरोपी मोकाट फिरत आहेत.
या प्रकरणामुळे राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात कायदा सुव्येस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गुंडाच्या दहशतीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.