नागपूर :राज्याची दूसरी राजधानी असलेल्या नागपुरात एकीकडे उड्डाणपुलामुळे शहराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात येते. यामुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडली अशा बड्या बड्या बाताही सत्ताधारी राजकीय नेते मारत असतात.मात्र शहराचा हा लौकिक कायम राखण्यास महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
नुकतेच मंगळवारी उड्डाणपुलावर रहदारी असेलल्या मार्गावरच लोखंडी सळ्या बाहेर आल्याचे चित्र दिसत आहे. या पुलावर बाहेर पडलेल्या लोखंडी रॉडला दुरुस्तीचे काम न करता कापड झाकण्यात आले.लोकसभा निडणुकीसाठी प्रशासन निवडणूक प्रक्रियेत व्यस्त असून,उड्डाणपुलावर दुरुस्ती करण्यापूर्वी ते एखादी दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहत असल्याचे दिसते.
सदर ते कडबी चौकाला जोडणाऱ्या मंगळवारी उड्डाणपुलापासून बाहेर पडलेल्या लोखंडी सळ्या वाहनधारकांसाठी धोका निर्माण करत आहेत. याठिकाणी दुरुस्तीचे कोणतेही प्रयत्न केले जात नसून बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांना कापडाने झाकण्यात आले.विशेषत: नागपुरातील उड्डाणपुलांवरील रस्ते अपघातांचा प्रश्न वणव्यासारखा पसरत असताना, प्रशासनाची उदासीनता या भीषण समस्येकडे बोट दाखवत आहे.
शहरातली रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत स्थानिकांच्या अनेक तक्रारी असूनही, उड्डाणपूलाची अवस्थाही तशीच होत चालली आहे. हे पाहता स्थानिक प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे.कदाचित ते कोणती दुर्दैवी घटना घडण्याची वाट पाहत असावेत.