Advertisement
नागपूर : शहारातील कमठी येथील एका पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी संध्याकाळी मारुती सुझुकी कारला आग लागल्याने एका खळबळ निर्माण झाली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अगोदर मोठा स्फोट झाला.त्यानंतर धूर आणि आगीच्या ज्वाळांनी वाहनाला वेढले. पेट्रोल पंपावर स्फोट होण्याच्या भीतीने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आग लागल्याचे लक्षात येताच कारचा चालक गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी कारला अचानक आग लागल्याचे कारण शोधण्यासाठी प्राथमिक तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरातील वाहतूक तात्पुरती विस्कळीत झाली होती.ही घटना सुरक्षेच्या खबरदारीचे महत्त्व आणि वाहनांच्या नियमित देखभालीच्या गरज अधोरेखित करते.