नागपूर: फेमस होण्यासाठी युवक कोणत्याही थराला जात असतात. नागपूरच्या एका युवकाने पाचपावली पोलीस ठाण्यासमोर रील बनविली. ही रील सोशल मीडियावर व्हायरल देखील झाली आहे. या रील वरून हा युवक गिट्टीखदान येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. कधी कोणी स्टंट करताना तर कधी सार्वजनिक ठिकाणी विचित्र कृत्य करताना दिसत असतात. युवकाचा पोलीस स्टेशन बाहेरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याने नागपुरात पोलिसांचा धाक उरला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
युवकाच्या या कृत्याबद्दल पाचपावली पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात येईल. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
View this post on Instagram