नागपूर : लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभामीवर भाजपचे नेते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकांच्या निकालानंतर जिल्ह्यात भाजपने आता गावागावांत जाऊन संघटन मजबुतीची योजना बनविली आहे. त्याअंतर्गत गाव पातळीवर पक्ष कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या समितीची रचना पूर्ण करण्यात येणार असून पुढील महिनाभर दोनशे पदाधिकारी पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार आहेत.
यापार्श्वभूमीवर वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे देखील कमला लागले आहे.
भारताच्या पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी पुन्हा निवडणून येणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप बहुमताने निवडून येणार असल्याचेही ते म्हणाले. एकट्या भाजपाकडून ३७० च्या वर जागा, महाराष्ट्रात ४२ चा वर जागा तर संपूर्ण एनडीए मिळून ४०५ आम्ही जिंकणार असल्याचे ते म्हणाले. तसेच येत्या २८ फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. महिला बचत गटाच्या सभेला ते संबोधित करतील.
त्यामळे महिला बचत गटांना बळ मिळणार असेही संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले.