नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. येत्या २० नोव्हेंबरला आम्हाला आमच्या पसंतीचा आमदार निवडण्याची संधी चालून आली आहे. यासाठी आमच्या मनातील आमदार कसा असावा, त्याने आमच्या भागासाठी, समाजासाठी काय करावे, त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत. हे आम्हाला कळवायाचे आहे. कारण विधानसभा निवडणुकीत आपला आवाज बुलंद करण्याची हीच योग्य वेळ आहे.
मतदान आपला जन्मसिद्ध अधिकार –
भारताची लोकशाही निवडणुकीच्या निकालांवर आधारित असते. मतदानाचा संवैधानिक अधिकार मिळाल्याने आपण भाग्यशाली आहे. मात्र कधी पर्यंत आपण जाती-धर्माच्या नावाखाली विभाजून त्याचे परिणाम भोगणार आहोत. पण जर आपण मतदान केले नाही तर आपल्या पैशांची केवळ खाजगी फायद्यासाठी उधळपट्टी केली जाईल.”माझ्या मताने फरक पडत नाही” या विचारातून राष्ट्रीय दृष्टीकोन बदलतो. त्यामुळे मतदान करणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे.
एखाद्या उमेदवारांना धर्म, जात, पात या वरून मतदान करायचे का ?
निवडणुकीत सर्वात मोठा प्रश्न आहे की आपण मतदान करणे का महत्त्वाचे आहे?
एखाद्या उमेदवारांना धर्म, जात, पात या वरून मतदान करायचे का ?
– महाराष्ट्रात 9.59 कोटी मतदाता आहेत.यातील लाखो मतदार विधानसभेसाठी पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. या नवनवीन मतदारांना २० नोव्हेंबरला कोणत्या उमेदवाराला मतदान करावे लागले याचा विचार अगोदर करणे गरजेचे आहे.
आम्ही धर्माच्या नावावर वोट देणार नाही –
भारतात अनेक धर्म, जाती आहेत आणि भारतीय संविधानाने प्रत्येकाला आपला धर्म जपण्याचा अधिकार दिला आहे .पण देशाच्या प्रगतीचा विचार केला तर जाती धर्माच्या नावावर मतदान करणे चुकीचे आहे. जर कोणता उमेदवार तुम्हाला धर्माच्या नावावर वोट मागेल त्याला सांगा आम्ही धर्माच्या नावावर वोट देणार नाही.
निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना प्रश्न विचारा –
निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या प्रत्येक उमेदवारांना प्रश्न विचारण्याचा अधिकारही एक मतदार म्हणून आपल्याला आहे.
तुम्ही आमच्या दैनंदिन जीवनाच्या समस्या सोडवू शकता की नाही ?
आमच्या मुलांना उच्च दर्जाचे education कसे प्रधान करणार हे सांगा?
तुम्ही आम्हाला सरकारी रुग्णालयात सोई-सुविधा प्रधान करू शकता का ?
आज सर्वसामान्य जनतेला आपल्या जीव वाचविण्यासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते. याठिकाणी त्यांची पैशांच्या नावावर लूट होते.
सरकारने कोणत्याही एक वर्गासाठी काम न करता सर्व समाजातील लोकांसाठी काम करावे.
तुम्ही जेव्हा एका विशिष्ट वर्गाला फ्रीमध्ये राशन देता. तसेच एका विशिष्ट वर्गाला पैसे वाटता. तेव्हा तुम्ही टॅक्स भरत असलेल्यांशी भेदभाव करता असे तुम्हाला वाटत नाही का ? दुसरीकडे देशात महागाईचा मुद्दाही डेकेवरून करून आहे. महिला एकेकाळी आलू – कांदे किलोच्या भावाने घेत होती, आज त्यांना पावानुसार ते घ्यावे लागत आहे, असे का?
ना बंटेंगे ना कटेंगे…सिर्फ अच्छे उमेदवार को चुनेंगे-
कधी पर्यंत आम्ही जाती-धर्माच्या नावाखाली विभाजून त्याचे परिणाम भोगणार आहोत.
आता वेळ आली आहे २० नोव्हेंबरला आपल्या परिसरारीतील उमेदवारांना पारखून त्यांना जाणूनच मतदान करण्याची… तुमचे मुलं फक्त गर्दीचा भाग बनून केवळ नाराच लावत राहणार की ते पण तुमच्या नेत्यांच्या मुलांसारखे विदेशात जाऊन शिक्षण घेणार, हा समाज तुम्हाला बनवायचा आहे. कारण तुम्ही मतदारराजा आहात. यामुळे तुम्हीच तुमचे मलिक आहात. त्यामुळे तुम्ही निवडून दिलेला उमेदवार तुमच्यावर राज कधीच करू शकत नाही.
ना बंटेंगे ना कटेंगे…सिर्फ अच्छे उमेदवार को चुनेंगे – जय महाराष्ट्र
– Aarti Sonkamble and Ross