Advertisement
नागपूर: शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या सीताबर्डी परिसरातील बुरड गल्ली तेलीपुरा येथील कच्चा घराचा भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे.ही इमारत फार जुनी असून घराचा काही भाग कोसळल्याने रहिवासी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. मात्र सुदैवाने सदर शिकस्त घरामध्ये कोणीही व्यक्ती दबलेले नसून जीवितहानी झाली नसल्याची माहिती घरमालक रवींद्र देवतळे यांनी दिली.
जीर्ण झालेल्या या इमारतीचा काही भाग कोसळल्यानंतर स्थानिकांनी अग्निशमन पथकाला याबाबत माहिती दिली. पथक घटनास्थळी दाखल होताच शोधकार्य सुरू करण्यात आले. मात्र कोणताही व्यक्ती ढिगाऱ्याखाली नसल्याचे आढळले.मात्र जीर्ण झालेली ही इमारत कधीही कोसळू शकते अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.