नागपूर : साप नाव काढले तरी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. त्यात जर साप कोणाच्या घरात किंवा घराजवळ जरी आला तर प्रचंड थरकाप उडतो. अशा वेळी सर्वात आधी सापाला मारण्यासाठी काठी शोधली जाते. मात्र शेतकऱ्यांचा मित्र, अन्न साखळी व पर्यावरणाचा महत्वपूर्ण घटक असलेल्या सापांबदल गैरसमज आणि भीती कमी होतांना दिसत आहे. आणि त्यामुळे जिल्ह्यात साप मारण्यापेक्षा त्याला वाचवण्याकडे कल पाहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर सदर पोलिसांकडून साप प्रजातीच्या प्राण्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला
सदर पोलीस स्टेशनमध्ये १९ जुलै रोजी दुपारी वन्य प्राणी आणि निसर्ग बचाव बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य नागपूर जिल्ह्यातील विविध भागातून पकडलेले विविध प्रजातीच्या सापांची सुटका करण्यासाठी एकत्र जमले होते. यामध्ये 14 फूट लांबा इंडिया रॉक पायथन (इंडियन पायथन) चा समावेश होते. हे अजगर यावेळी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. सदर पोलीस ठाण्याचे मुख्य पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांच्या सहकार्याने नागपुर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सापांबाबत जनजागृती करणे हा मुख्य उद्देश होता.