नागपूर : शहरातील रामझुला ओहरब्रिजवर मर्सडिजने चिरडल्याने दोन तरुणांचा मृत्यू झाला.महिलेच्या बेजबाबदारपणामुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा बळी गेला आहे. नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारच्या मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेत काळ्या रंगाच्या मर्सडिज मध्ये असलेल्या महिलेने दुचाकीला मागून धडक दिली.
मोहम्मद हुसेन गुलाम मुस्तफा (34, रा.नालसाहब चौक) आणि मोहम्मद आतिफ मोहम्मद जिया (34, रा. जाफरनगर, अवस्थी चौक) असे मृतांचे नाव आहे. तर माधुरी शिशिर सारडा (37, वर्धमान नगर) आणि रितिका ऊर्फ रितू दिनेश मालू (39, रा.देशपांडे ले-आउट) अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत.यातील रितू मालू ही महिला कार चालवीत होती.
या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात हिट अँड रन (Rash Driving)अंतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणातील संशयित आरोपी हे उच्चभ्रू परिवारातल्या असल्याने पोलीस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप पीडितांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर ‘नागपूर टुडे’बोलतांना शहरातील जनतेने याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.
‘त्या’ महिला आरोपींना अवघ्या 24 तासांच्या आत जामीन-
या प्रकरणी मोहम्मद हुसेनचा भाऊ इफ्तेखार निसार अहमद (48, रा. हंसापुरी) यांनी तत्काळ तहसील पोलीस स्टेशन गाठत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. मात्र या प्रकरणी पोलिसांनी अटक करून महिलांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाकडून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. घटनेच्या वेळी दोन्ही महिला दारू पिऊन असल्याचा दावा देखील पीडित कुटुंबाचा आहे. पोलीसांनी दोन्ही महिलांची वैद्यकीय तपासणीकडून रक्ताचे नमुने घेतले. मात्र संशयित आरोपींना अवघ्या 24 तासाच्या आत जामीन मिळाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागपूरकर जनतेचा संताप : –
या भीषण अपघातात दोन तरुणांचा जीव गेल्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. याप्रकरणी स्थानिक नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जनतेने ‘नागपूर टुडे’शी बोलताना नाराजी व्यक्त करत दोषी महिलांन कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपही महिललेवर कठोर कलम ३०४ ऐवजी आयपीसीच्या कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवला. त्यामुळे या महिलांना 24 तासाच्या आत जामीन मंजूर झाला. या महिला उच्चभ्रू परिवारातील असल्याने पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्यात येत आहे. प्रशासनाला गरिबांच्या जीवाची काही किंमत नाही का ? असा सवालही जनतेनी उपस्थित केला. ‘त्या’ प्रतिष्ठीत महिलांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही नागपूरच्या जनतेनी केली.