नागपूर : खामला परिसरात ‘अमनजेना स्पा-मसाज सेंटर’मध्ये सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी भांडाफोड केला आहे.स्पा-मसाज सेंटर’मध्ये अचानक ग्राहकांची गर्दी वाढायला लागली. तेथे तरुणींसह अल्पवयीन मुलीसुद्धा यायला लागल्या. त्यामुळे संशय आल्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून सेक्स रॅकेटवर धाड टाकली. पोलिसांनी देहव्यवसाय चालवणाऱ्या ३ आरोपींना अटक त्यांच्या तावडीतून ४ मुलींची सुटका केली आहे.
मनीषा उर्फ महिमा सुरेश फरकाडे (३५) रा. हिलटॉप, रामनगर, सरोज मनोज शर्मा (३८) रा. सोनबानगर, वाडी आणि नीलेंद्र महेश उके (३४) रा. कंट्रोलवाडी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मनिषा फरकाडे आणि सरोज शर्मा यांनी खामलाच्या सत्यसाई अपार्टमेंटमध्ये ‘अमनजेना स्पा सेंटर’ उघडले होते. स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर नागरिकांना संशय आला.एका नागरिकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असताना सत्य समोर आली. त्यानंतर सापळा रचून पंटरला ग्राहक बनवून तेथे पाठवले. पंटरने आरोपींशी तरुणीचा सौदा होताच पोलिसांना इशारा दिला. इशारा मिळताच पोलिसांनी स्पा सेंटरवर धाड टाकली असता चार मुली मिळाल्या.
गरजू मुलींना पैशांचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून देहव्यवसाय करून घेत होते. पोलिसांनी मनीषा, सरोज आणि नीलेंद्र विरुद्ध पीटा अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली.
दरम्यान उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलिस आयुक्त श्याम सोनटक्के , सारीन दुर्गे ,पोलीस हवालदार लक्ष्मण चवरे, सचिन बढीये, लता गवई, शेषराव राऊत, अश्विन मांगे, नितीन वासने यांनी केली.