नागपूर : शहरातील नंदनवन परिसरातील हसन बाग चौक येथे ओव्हरलोड ट्रक फसल्यामुळे वाहतूक कोंडी निर्णय झाल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा ट्रक रेतीने भरलेला असून ओव्हरलोड झाल्याने परिसरातील डांबरी रास्ता खचला.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. माहितीनुसार, हा ट्रक रस्त्यावरून जात असताना त्याचे टायर जमिनीत फसले. त्यानंतर ट्रक जागेवरच थांबला, आणि यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला.
ट्रक ओव्हरलोड असल्याने रस्त्यावर रेती विखुरली गेली. या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. ओव्हरलोड ट्रकवर कारवाई झाली असती, तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती,असे स्थानिकांनी सांगितले.
महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, ट्रक हटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला.