नागपूर : नागपूर : मोबाईल आणि लॅपटॉपची चोरी करणाऱ्या तामिळनाडू टोळीचा नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने पर्दाफाश केला आहे. जगदीशन माजीचिन्नय पंझानी (३२), व्यंकटेश शंकर (३५) आणि गोधानधन रंगार मुनुस्वामी (२२) या तीन आरोपींना अटक केली असून या आरोपींवर एकूण १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सोबतच आरोपींकडून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या तिन्ही आरोपींनी राणप्रताप नगर पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, गणेशपेठ पोलीस ठाणे, सक्करदरा पोलीस ठाणे, हुडकेश्वर पोलीस ठाणे, यशोधरा नगर पोलीस ठाणे, अजनी पोलीस ठाणे, गिट्टीखदान पोलीस ठाणे, न्यू कामठी पोलीस ठाणे आणि सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध घरांना लक्ष्य केले होते.
राणप्रताप नगर पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर, गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने या तिन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.