Advertisement
नागपूर : सक्करधरा तलावात मित्रांसोबत कमळाचे फुलं तोडण्यासाठी गेलेल्या युवकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.सोमवारी सकाळी पहाटेच्या सुमारात ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर एनडीआरएफच्या पथकाने युवकाचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. नानो (वय २४, रा. प्रेमनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
माहितीनुसार, ही घटना घडल्यानंतर काही स्थानिकांना प्रथम मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यानंतर स्थानिकांनी सक्करधरा पोलिसांना माहिती दिली.
सक्करधरा पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.