Advertisement
नागपूर: माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या काकू सौ. विजयमाला वामनराव मुळक यांचे आज सकाळी ११ वाजता निधन झाले. आजारपणामुळे त्यांना ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अंतिम श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती वामनराव मुळक, मुलगी श्रीलेखा राजेन लांजेकर, माधवी विनय मगर, बहीणभाऊ आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.