बिल्डिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा आयसीआय पुरस्कार यावर्षी स्ट्रक्चरल इंजिनियर विजेंद्र कळंबे यांना देण्यात आला. विजेंद्र कळंबे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांची या पुरस्कारा साठी निवड करण्यात आली. आय सी आय अल्ट्राटेक स्ट्रक्चर 2025 चा सर्वोत्कृष्ट पुरस्काराने विजेंद्र कळंबे ना ली मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या एका सर्वोत्कृष्ट कार्यक्रमात यांना गौरविण्यात आले.
त्यांनी या क्षेत्रात केलेल्या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूपात त्यांना मिळाल्याची चर्चा सर्व दूर आहे. मागील तीन वर्षात विजेंद्र कळंबे यांनी या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत सहा अवार्ड मिळविले आहे. सतत तीन अवॉर्ड मिळवून विजेंद्र कांबळे यांनी या पुरस्काराची हॅट्रिक साधली आहे. आतापर्यंत त्यांना वेगवेगळ्या कनेक्शन मध्ये सहा अवार्ड आणि सन्मानित करण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या ली मेरिडियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुमधुर संगीतमय कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरात विजेंद्र कळंबे यांनी हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. मनमिळाऊ व्यक्तिमत्व कार्य करण्याची उत्तम शैली, चिकाटी, जिद्द, विपरीत परिस्थितीत काम करण्याची तयारी,या गुणांच्या आधारे विजेंद्र कळंबे यांनी या पुरस्काराला सतत गवसणी घातली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मित्रपरिवार आणि कुटुंबीयांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.