Published On : Wed, Dec 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

व्हिडीओ ; महामेट्रोने केला 1500 कोटींचा भ्रष्टाचार अन् कारवाई मात्र शून्य ; काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचा आरोप

ब्रिजेश दीक्षित यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची काँग्रेसची मागणी
Advertisement

नागपूर : शहरात गेल्या 9 वर्षांपासून नागपूर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरु असून आतापर्यंत पहिल्या टप्प्याचेही काम पूर्ण करण्यात महामेट्रो सपशेल अपयशी ठरली आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केला.

गेल्या वर्षी डिसेंबर 2022 मध्ये या प्रकल्पाच्या कार्यात १00 कोटींचे गैरव्यवहार झाल्याचा ठपकाही कॅगच्या अहवालातून समोर आला . महामेट्रोमधील या भ्रष्टाचाराच्या विरोधात नागपूर शहर (जिल्हा) कॉग्रेस कमिटीच्यावतीने महामेट्रोविरोधात आंदोलन करुन महा मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले. यातच रिसर्च डिजाईन एन्ड स्टॅनडर्ड्स ऑर्गनाएझेशनचे (RDSO, रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणारी संस्था) बनावट पत्र लावून मेट्रो प्रकल्पाचे संचालनही सुरु केल्याची धक्कादायक माहिती अधिकारअंतर्गत उघडकीस आली आहे.

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ब्रिजेश दीक्षित यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवा-
महामेट्रो अंतर्गत संचालन करण्यात येत असलेल्या नागपूर मेट्रो प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असून अनेक गैरव्यवहार झाल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहे. यातच मेट्रोचे संचालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या विद्युत वाढीनीच्या सर्टीफिकेशन संदर्भात चवक केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाचीच फसवणूक मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मेट्रो रेल्वेचे संचालन नागरिकांसाठी खुले करण्यापूर्वी रिसर्च डिजाईन एन्ड स्टॅनडईस ऑर्गनाएझेशनचे (RDSO) ऑडिट करुन त्यांची मान्यता घेणे बंधनकारक असते. या संस्थेची कुठलीही परवानगी न घेता 26 डिसेंबर 2017 रोजीचे RDSOचे बनावट पत्र मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी तयार करुन मेट्रोचे संचालनदी सुरु केले. ही बाब 25 ऑक्टोबर 2023 च्या RDSOने माहिती अधिकार अंतर्गत दिलेल्या उत्तरात उघडकीस आली. या संदर्भात महामेट्रोचे माजी एमडी विजेश दीक्षित यांच्यासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवून तत्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तसेच महामेट्रोमध्ये सेवेत नसताना मागिल सात महिन्यांपासून मुंबईतील मेट्रोच्या बंगल्यातून दीक्षित यांची हकालपट्टी करुन त्यांच्याकडून याचे खर्च वसूल करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

1500 कोटींचे भ्रष्टाचार अन् कारवाई मात्र शून्य-
डिसेंबर 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या कॅगच्या अहवालात महामेट्रोने 900 कोटींचे भ्रष्टाचार केल्याचा ठपका लावण्यात आला. यासह वर्षभरात विविध 19 कामांत महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी खासगी कंपन्यांना कोट्यावधींचे लाभ मिळवून देण्यासाठी तब्बल 600 कोटींचे घोटाळे केले आहे. या घोटाळ्याचेमुख्य सूत्रधार माजी एमडी ब्रिजेश दीक्षित आणि त्यांचे अधिकारी आहेत. असे असतानाठी दीक्षित यांची पुन्हा एमएसआयडीसीच्या एगडीपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम राज्य सरकारने केले. त्यामुळे ब्रिजेश दीक्षित यांची पदावरुन तत्काळ ढकालपट्टी करुन त्यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांच्या मालमत्तेचीडी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

महामेट्रोच्या हिंगणा कार डेपोमध्ये गुरुग घोटाळा-
महामेट्रोच्या नागपुरातील हिंगणा मार्गावरील कार डेपोमध्ये साठविण्यात आलेले मुरुम एका कंत्राटदार कंपनीला उचलण्याची अवैध एरवानही मेट्रोच्या संचालकाने दिली होती. मात्र डेपोमधील साठविण्यात आलेली मुरुम न उवलता चक्क एक मुरुमचे डोंगरव या कंत्राटदाराने खोदून त्यातून कोट्यावधींची कमाई केली, यावरही आतापर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. विशेष बाब म्हणजे महामेट्रोच्या विविध कार्यात मोठ्याप्रमाणात मुरुमची खरेदी करण्यात येते. यात महामेट्रोचे कोट्यावधी पये खर्च होतात, असे असताना एखाद्या कंत्राटदाराला याची परवानदी देणे म्हणजे स्पष्ट भ्रष्टाचार करण्यात आले आहे.

दोषी अधिकाऱ्यांकडून वसूल करा 600 कोटी
नागपूर मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा 2018 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना अधिकाऱ्यांच्या कागयुकारपणामुळे आतापर्यंतही पूर्ण झाला नसल्याने प्रकल्पाचा खर्च 600 कोटी रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे दा 600 कोटी रुपयांचा पाढीव सार्च अधिकान्यांकडून वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement