Published On : Thu, Nov 9th, 2017

नोटाबंदीच्या निर्णयावेळी मोदींनी मंत्र्यांना खोलीत डांबलं होतं: विलास मुत्तेमवार

नागपूर: नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नितीन गडकरी यांच्यासह अनेक महत्वाच्या नेत्यांना एका खोलीत डांबून ठेवल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी केला आहे.

नागपूरमध्ये नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसतर्फे आक्रोश मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बोलताना विलास मुत्तेमवार यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

विलास मुत्तेमवार नेमकं काय म्हणाले?

Gold Rate
Tuesday 04 March 2025
Gold 24 KT 86,100 /-
Gold 22 KT 80,100/-
Silver / Kg 95,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

‘हुकूमशाही गाजवणाऱ्या नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर करताना नितीन गडकरी यांच्यासह अनेक मोठ्या मंत्र्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. त्यावेळी मग गडकरींनी विरोध का केला नाही?, जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते तेव्हा गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यावेळी मोदी गडकरींना ग्लासातून पाणी आणून द्यायचे.मग आता त्याच मोदींना गडकरी घाबरु लागले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयावेळी एका शब्दानं हे लोकं त्यांना काही बोलले नाही?’ असं मुत्तेमवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, या सभेत भाजपवर टीका करताना विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली. भाजपवर टीकास्त्र सोडताना वडेट्टीवार यांनी शिवराळ भाषेचाही वापर केला.

Advertisement